THANE ZILLA STREE SHAKTI JAGRUTI SAMITI

02528 222134 / 986 093 6760

showcase image

1975 साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे झाले. त्या निमित्ताने तलवाडा व ठाणे येथे महिलांचे भव्य मेळावे आयोजीत करण्यात आले होते.संपूर्ण वर्षभर शैक्षणिक शिबीरे, पदयात्रा श्रमदान, स्नेहसंमेलने, चर्चासत्रं आयोजित केली होती. त्यातुनच ठाणे जिल्हा स्त्री शक्ति जागृती समितीची स्थापना सन 1975 रोजी झाली कै. पद्मश्री अनुताई वाघ व माजी राज्यमंत्री श्रीमती ताराबाई वर्तक यांनी संस्थेच्या कार्याला मुर्त स्वरूप आणून दिले. महिला,बालके व अपंग यांचे सर्व प्रकारचे कल्याण ज्या ज्या दृष्टीने करता येईल ती सर्व कामे करण्याचा संस्थेचा मुळ हेतू आहे. या संस्थेची 2008 पासून मालती रमेश चुरी यांनी अध्यक्ष पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.

" शाळेची थोडक्यात माहिती "

(Reged.No.153/Recong-Extn/84-85/D-7, Dtd.15-06-1984,( कायमची मान्यता, RCI NO.0122) पालघर जिल्ह्यातील डहाणू तालूका हा महाराष्ट्राच्या आदिवासी विकास आराखड्यामध्ये मोडतो. त्याद्वारे आदिवासी समाजाची विविध शैक्षणिक सांस्कृतीक व सामाजिक जिवनामध्ये प्रगती झालेली आहे. कृषी विषयक नवनवीन कार्यक्रम आत्मसात करून आपली शेती, फ़ळबाग फ़ुलवण्यांचे काम येथिल आदिवासी शेतकरी करित आहे. पश्चिमेकडिल खळाळणारा समुद्र व पुर्वेकडील आकर्षक डोंगररांगा या दोन्ही मध्ये वसलेल्या या निसर्गरम्य पट्ट्यामध्ये राहणा-या वस्तीमधील अपंग मुलांच्या ऊन्नतीसाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करून 23 जून 1980 रोजी पद्मश्री कै. अनुताई वाघ यांनी मुक बधिर मुलांची शाळा सुरू केली. अवघ्या पाच मुक बधिर मुलांना घेऊन शाळा सुरू झाली.( शाळेच्या स्थापनेनंतर एका वर्षातच विद्यार्थ्यांची संख्या 40 वर गेली आणि शिक्षकांची संख्या 5 वर गेली ) शाळेला स्वताची वास्तु नसल्यामुळे एका ठीकाणाहून दुसरीकडे अशि सारखी शाळेची जागा बदलावी लागत असे. अपेक्षापेक्षा जास्त मुलांची नोंदणी होऊ लागल्याने व वसतीगृहाची गरज भासू लागल्यामूळे समितीने वसतीगृहयुक्त शाळा सुरू केली. मुक बधिर मुलांची शिक्षणाची ओढ पाहून कै. श्रीमती सविताबाई अभ्यंकर यांनी लायन्स क्लब ऑफ़ डहाणूला दान केलेल्या जमिनीतून मुक बधिर शाळेसाठी लागेल तेवढी जागा देण्यासाठी विनंती केली. लायन्स क्लबनेही थोर तपस्वीनी अनुताई वाघ यांचे कार्य पाहून या शाळेसाठी 10 गुंठे जागा बक्षिसपात्र देण्याचा ठराव मंजुर करून संस्थेला 10 गुंठे जागा दिली. आज त्याच जागेवर मुक बधिर बाल विकास केंद्र शाळेची भव्य ईमारत ऊभी आहे. आतापर्यंत सुमारे 450 विद्यार्थी पहिली ते 10 वी पर्यंत शिक्षण घेउन बाहेर पडले आहेत. तसेच आज 100 विध्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. शाळेतील मंजुर विद्यार्थी संख्या 70 असून शाळेला समाजकल्याण खात्याची कायमस्वरूपी मान्यता आहे. त्याचप्रमाणे 70 मंजुर विद्यार्थी संख्येसाठी शासनमान्य शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी वर्ग संस्थेला लाभलेला आहे. शाळेचे सर्व कामकाज शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा सदाशीव चव्हाण या पाहतात. सर्व शिक्षक वर्ग प्रशिक्षीत व आर सी आय मान्यताप्राप्त असून मेहनती व निष्ठावान आहेत. ( शाळेमध्ये शिशूवर्गापासून इ.10 वी पर्यंत एकूण 9 वर्ग चालवीले जातात.) सर्व वर्ग तांत्रीक साहीत्याने सुसज्ज आहेत.( एकुण सर्व वर्ग मिळून 6 गृपहिअरींग एड व 3 स्पिच ट्रेनर आहेत.)

" वसतीगृहाची थोडक्यात माहिती "

(Reged.No.153/Recong-Extn/84-85/D-7, Dtd.15-06-1984,( कायमची मान्यता, RCI NO.0122) शाळेला जोडून कर्णबधिर मुलींचे वसतीगृह चालवीले जाते.या वसतीगृहास शासनाकडून 70 मुलांची मान्यता आहे. व आज पटावर 42 मुले व 28 मुळी असे दोन भाग करण्यात आले आहेत. 10 वर्षाखालील मुले व मुली अशी 40 विद्यार्थ्यांची झोपण्याची व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात आली आहे. तळमजल्या वरिल कॉमन हॉल मध्ये उर्वरित 30 मुलांची व्यवस्था केली आहे. मुलांना झोपण्यासाठी अंथरूण पांघरूण संस्थेतुनच देण्यात आली आहेत. जेवणासाठी हॉल स्वयंपाकघर कोठीघर सुसज्ज असून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मुलांची काळजी घेण्यासाठी शासनमान्य कर्मचारी नेमले असून त्यांच्या कामाच्या वेळेप्रमाणे नियोजन करून कर्मचारी वर्ग मुलांची सर्वोतोपरीने काळजी घेतात. वसतीगृहात वयाच्या 5 व्या वर्षापासून प्रवेश दिला जातो. प्रत्येक मुलांच्या मागे शासनमान्य अनुदान शासनाकडून मिळत असले तरी संस्थेला होणारा जादा खर्च संस्था दान गोळा करून करते. वसतीगृहाचे सर्व कामकज वसतीगृह प्रभारी अधिक्षक म्हणून श्री. विराज सावे हे पाहतात.

मुक बधिर मुलांना शिक्षण देण्याचे तंत्र:-

1.श्रवण प्रशिक्षण 2.ओष्ठ वाचन 3.स्मरण 4.वाचा 5.उच्चार दुरूस्ती 6.भाषा शिक्षण 7.विशेष शालेय शिक्षण 8.चित्रकला 9.भरतकाम विणकाम शिवणकाम 10.सुतारकाम 11.हस्तकला 12.शारिरिक शिक्षण 13.नृत्य व नाट्य प्रशिक्षण 14.पालकांना मार्गदर्शन 15.स्पिच व श्रवण चिकित्सा यासाठी विशेष ऑडिओमेट्री रूम.16 दृक श्राव्य ज्ञानासाठी रंगीत टी.व्ही. टेपरेकॉर्डर स्लाईड प्रोजेक्टर 17.आवांतर ज्ञानासाठी मनोरंजक पुस्तकासह लायब्ररी 18.प्रयोगशाळा या सर्व साधनांचा वर्गामध्ये शिकवितांना शिक्षक त्याचा उपयोग करून भाषावाढ करण्यासाठी प्रयत्नशिल असतात.

सांस्कृतीक व नाट्य कार्यक्रम:-

शालेय स्तरावर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महान व्यक्तिंच्या पूण्यातिथी तसेच जन्मतिथी, धार्मिक सण व ऊत्सव साजरे करून भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याचे ज्ञान दिले जाते. राष्ट्रीय सणांचे महत्व पटवून देऊन देशाबद्दल एकात्मतेची व देशाभिमाची जाणिव करून दिली जाते. नाट्य कलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांची विविध नाटके बसवून नाट्यशाला या मुंबई च्या संस्थेमार्फ़त आयोजित नाट्य स्पर्धेत मुलांना संधी देऊन त्यांच्या अंगच्या अभिनय कौशल्याला चालना देण्यात येते.


उद्योगालय:-

संस्थेचा एक छोटा उद्योगवर्ग आहे. मुक बधिर मुलांना आध्यापनाबरोबर व्यवसाय शिक्षण देणे महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्योगवर्गात सुतरकाम, रंगकाम, फ़्रेटकाम, स्क्रीन प्रिंटींग, शोभेच्या वस्तु बनविणे, वेगवेगळी खेळणी व पझल बनविण्याचे शिक्षण दिले जाते. सुतारकामाचे प्राथमिक शिक्षण शाळेतच दिले असल्याने 10 वी नंतर मुलांना औद्योगीक प्रशिक्षणास सहज प्रवेश मिळतो.

क्रिडा स्पर्धा:-

शाळेच्या एका बाजूने लायन्स पार्क मुलांना खेळण्याकरिता आहे. तर दुस-या बाजुस भव्य मोकळे मैदान आहे. शारिरिक शिक्षणास मुलांना तरबेज करून तालुका जिल्हा व राज्य पातळीपर्यंत होणा-या क्रिडा स्पर्धेत त्यांना सहभागी केले जाते. दि. 3 डिसेंबर 2016 रोजी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरिय क्रिडास्पर्धांचे आयोजन पालघर येथे समाजकल्याण विभाग पालघरने केले होते त्या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेला एकूण 21 बक्षिसे मिळाल्याबद्दल चॅम्पियन्स ट्रॉफ़ी मिळाली.


पुनर्वसन:-

अपंगाना महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या वाहतुकीच्या विविध सवलती बद्दल तसेच बिज भांडवल योजने बद्दल मार्गदर्शन करण्यात येते.

ऑडिओमेट्री व स्पिच रूम:-

शाळेमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी स्पिच रूम असून त्यात तिन महिन्याच्या शिशू पासून श्रवण चिकित्सा केली जाते. व त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. शाळेतिल विद्यार्थ्यांचे वर्षातून दोनदा ऑडिओग्राम काढले जातात. व त्यापासून त्यांची स्पीच दुरूस्ती व भाषावाढ करण्याचा प्रयत्न शाळेच्या वाचा उपचार तज्ञ करतात. तसेच ऑडिओलॉजीस्ट श्रीमती गॉवेर मुबारकै यांची विनामुल्य सेवा या मुलांचे श्रवणालेख व वाचा दुरूस्तीसाठी होत असते.